🕒 1 min read
आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (IIFA) हा भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रसिद्ध पुरस्कार सोहळा आहे. IIFA पुरस्कार सोहळा त्याच्या 23 व्या आवृत्तीसह पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. IIFA 2022 प्रमाणेच IIFA 2023 देखील अबुधाबी (Abu Dhabi) येथे पार पडणार आहे. मुंबईमध्ये या संदर्भात नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये सलमान खान (Salman Khan), फरान अख्तर (Farhan Akhtar), फरान खान (Farhan Khan), करण जोहर (Karan Johar), वरुण धवन (Varun Dhawan) यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले होते.
9, 10 आणि 11 फेब्रुवारी 2013 रोजी अबुधाबीमध्ये IIFA 2023 सोहळा पार पडणार आहे. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान दोन दशकाहून अधिक काळ कुटुंबाचा भाग आहे. पत्रकार परिषदेदरम्यान सलमान खान म्हणाला, “मला अबुधाबीमध्ये परत जाण्याचा आनंद आहे. मागच्या IIFA सोहळ्यामध्ये रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि मनीष पॉल (Manish Poul) यांच्यासोबत मी कार्यक्रम होस्ट करत सर्वांना हसवले होते. त्याचबरोबर या कार्यक्रमादरम्यान मी माझ्या भावना देखील व्यक्त केल्या होत्या. तर यावेळी मी त्यांना माझ्यासोबत नृत्य करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे.”
सलमान खानशिवाय या परिषदेला अभिनेता वरुण धवन देखील उपस्थित होता. यावेळी वरुण धवन म्हणाला की,”IIFA माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. हे एक असे व्यासपीठ आहे जे मला जगभरातील चाहत्यांशी कनेक्ट होऊ देते.” त्याचबरोबर पत्रकारांशी बोलताना फरहान मनाला की,”सर्वोत्कृष्ट पदार्पण ते सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट चित्रपट इत्यादी श्रेणीमध्ये मला IIFA कडून सन्मानित होण्याचे भाग्य लाभले आहे.”
अबुधाबीमध्ये होणारा IIFA 2023 हा सोहळा बॉलीवूड अभिनेता अभिषेक (Abhishek Bachchan) बच्चन, मनीष पॉल आणि फरहान अख्तर होस्ट करणार आहे. त्याचबरोबर करण जोहर आणि फरान खान ही जोडी यावेळी आयफा रॉक्स होस्ट करणार आहे. याबद्दल बोलत असताना करण म्हणाला की, “IIFA स्टेजवर फरहानसोबत होस्ट करताना मला खूप आनंद होणार आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Vikram Kirloskar Death | ‘टोयोटा’ची वेगळी ओळख निर्माण करणारे, विक्रम किर्लोस्कर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन
- Winter Care Tips | सावधान! हिवाळ्यामध्ये स्वेटर घालून झोपत असाल तर होऊ शकतात ‘या’ आरोग्याच्या समस्या
- IND vs NZ | “पंतला आता विश्रांती देण्याची…”; संजू सॅमसनला संघातून वगळल्याने शशी थरूर संतापले
- AIDS/HIV | तीन वर्षांपासून HIV प्रतिबंध आणि उपचारात कोणतीही प्रगती नाही – Unicef
- IND vs NZ | भारत आणि न्यूझीलंडमधील तिसऱ्या वनडे सामन्यात संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
