Shiv Sena : राज्यपालांच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका

मुंबई: राज्यातील सत्तांतर नंतर शिवसेनेने अजून एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. यावेळी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने याचिका केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्यास दिलेल्या आमंत्रणावरून सुभाष देसाई (Subhas Desai) यांनी सदरील याचिका केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी  केली असून याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. या सोबतच शिंदे गटाने अजय चौधरी यांच्या केलेल्या नियुक्तीला आव्हान दिले आहे. या सर्व घडामोडीत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले. त्यानंतर राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. शपथ विधीच्या तीन दिवसांनी राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. याचवेळी  विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यावरूनच सुभाष देसाई यांनी याचिका दाखल केली आहे.

सुभाष देसाई यांनी शिंदे सरकारच्या बहुमत सिद्ध करण्याच्या प्रकियाविरोधात तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक संदर्भात सदरील याचिका दाखल केली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिंदे गट तसेच भाजप अशी ही लढाई होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या: