🕒 1 min read
सिंधुदुर्ग : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विधानसभेचं २ दिवशीय विशेष अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात अनेक वादळी घडामोडी घडल्या. यानंतर प्रत्येक पक्षातील आमदार हे आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. कोकणात पावसाला सुरवात झाल्यानंतर सगळीकडे भात लावणी सुरु आहे. त्यातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये शेती केली.
सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत नितेश राणेंनी भात लावणी केली. नांगर चालवला. गुरं हाकली. नंतर शेतातच न्याहारीही केली. या सर्व गोष्टी करतानाचा एक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत चक्क नितेश राणे यांनीही भातशेतीचं काम केल्याचं दिसून आलंय. तसेच यावेळी नितेश राणेंनी शेतीचं काम करुन थकल्यानंतर शेतात बांधावरच न्याहारीही केली. त्याआधी बैल आणि छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने शेताची मशातही त्यांनी केली.
दरम्यान, दुसरीकडे भास्करराव जाधव हे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत. जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात. त्यांनी कष्ट करून शेतात पिकवलेलं धान्य त्यांना वर्षभर पुरतं. समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदांवर पोहोचले तरी जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही. जाधव यांच्या कामाची दाखल प्रसारमाध्यमांनी देखील घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
