Share

Shivsena : शिवसेनेला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने दिला शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असून पक्ष संघटना उभी करण्यासाठी ते पुन्हा मैदानात उतरले आहे. येणाऱ्या काळात शिंदे आणि ठाकरेंमध्ये मोठा संघर्ष पहायला मिळेल. तसेच शिवसेनेला सध्या धक्क्यांवर धक्के बसत आहेत. यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे.

एकीकडे शिवसेनेच्या आमदारांनी साथ सोडलेली असताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडसूळ यांनी राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. आनंदराव अडसूळ यांच्या कठीण काळात शिवसेना पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. तसेच ईडीने केलेल्या कारवाई दरम्यान आणि आजारपणात शिवसेना नेतृत्वाने साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत अडसूळ यांनी ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी १८ खासदारांपैकी १२ खासदार आणि २२ माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा मोठा दावा केला आहे. आता पार्टी कुणाची, तर आमची. ४ खासदारांना तर मी स्वतः भेटलो आहे. आमच्यासोबत २२ माजी आमदार देखील येणार आहेत. आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना आहे. आम्ही हा पक्ष उभा करू. ते वैभव परत प्राप्त करू, असे यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!