🕒 1 min read
मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध (ENG vs IND) पहिला टी-२० खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. साउथम्प्टन येथे हा सामना खेळवला जाईल. या सामन्यातून कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करत आहे. दुसरीकडे, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
टीम इंडिया क्रमवारीत अव्वल स्थानावर असून इंग्लंडच्या नजरा या स्थानावर असणार आहेत. इंग्लिश संघ आपला नवा कर्णधार जोस बटलरसह मैदानात उतरणार आहे. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या स्टार खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. दोन्ही संघात टी-२० तज्ज्ञ खेळाडू आहेत, त्यामुळे चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. भारतीय संघाने नुकतीच आयर्लंडमध्ये दोन सामन्यांची मालिका जिंकली.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
- इंग्लंड – जोस बटलर (कप्तान), फिलिप सॉल्ट, जेसन रॉय, डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, डेव्हिड विली, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, रीस टोपले
- भारत – रोहित शर्मा (कप्तान), दिनेश कार्तिक, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान/उमरान मलिक, हर्षल पटेल
हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता सुरू होईल. सोनी स्पोर्ट्स आणि सोनी LIV वर हा सामना थेट पाहता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
