🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या राजकारणातुन दररोज धक्कादायक घटना समोर येत आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना सध्या धक्क्यांवर धक्के बसत आहेत. ३९ आमदारांनी साथ सोडल्यानंतर आता खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर एक धक्कादायक घटना घडली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर त्यांनी भेटण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शहापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमधील भगवान काळे यांचे ‘मातोश्री’ निवसस्थानाबाहेर निधन झाले. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांना ते आपल्या गाडीतून मातोश्रीवर दाखल झाले होते.
पक्षाची बैठक सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर भगवान काळे यांच्या मृत्यूने शहापुरातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांसह सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. दरम्यान, पक्षावरील ताब्यावरून येणाऱ्या काळात ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
