Share

Balasaheb Thorat : एक दिवस असा येईल की महागाईच्या विरोधात सर्वसामान्य जनता पेटून उठेल – बाळासाहेब थोरात

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : सत्ता बदलानंतर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना सावधान करत महत्वाचा सल्ला दिला आहे. आगामी काळासाठी आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आपल्यामध्ये मतभेद करणारे काही येतील. त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवा आणि काँगेसची एकजूट दाखवून द्या, असं आवाहन थोरात यांनी केले.

सरकार पडले असले, तरी आगामी काळात काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी जोमाने काम करण्याच्या सूचना थोरात यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. प्रसार माध्यमांशी बोलताना थोरात यांनी वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर शिवसेना आमदार दीपक केसरकरांनी चांगलं खातं घेऊन हॉस्पिटल उभारणीचा प्रश्न सोडवावा, मी त्यांचं अभिनंदनच करेन, असा टोलाही थोरातांनी लगावला.

थोरात पुढे म्हणाले कि काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना पक्षाला सन्मान मिळून देत महाविकास आघाडी सरकार राज्यात अस्तित्वात आणली. या सरकारच्या काळात करोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी यासारख्या मोठ्या संकटातूनही शेतकऱ्यांना २ लाख रुपये कर्जमाफीसह महाविकास आघाडी सरकारने पायाभूत विकासाचे अत्यंत चांगले निर्णय घेतले. सत्ता येते आणि जाते, पण जनतेची कामे करणे महत्त्वाचे असते.

सत्तेचा उपयोग हा गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केला आहे. पक्ष नेतृत्वाच्या विश्वासामुळे देश पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. राज्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहोत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिमत्व सरळ आहे. त्यांनी अनेक वेळा विश्वास टाकला यातून महाविकास आघाडी सरकार मधून सर्वसामान्यांसाठी मोठे निर्णय घेता आले. असेही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!