🕒 1 min read
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेतील अंतर्गत मतभेदामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि राज्यात नवीन शिंदे सरकार अस्तित्वात आलं. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. तसेच एकनाथ शिंदे संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
यानंतर कालपासून मुख्यमंत्री शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांना लागेल ती मदत करा मी आहे, असं बोलताना दिसत आहेत. सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. या व्हिडिओनंतर एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
दरम्यान, त्यांचा आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. ठाणे अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू असताना मुख्यमंत्री निघण्याच्या वेळेस पोलीस कर्मचारी रूपाली साळुंखे यांचा तोल जाऊन पाय घसरुन पडल्या. त्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच एकनाथ शिंदे यांनी स्व:तहून पोलीस कर्मचारी रूपाली साळुंखे यांची विचारपूस केली. एवढंच नाही तर पुढे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
