Share

Shrikant Shinde : कामाख्या देवीने कोणाचा बळी घेतला?, श्रीकांत शिंदेंचा राऊतांवर पलटवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात पोहचले आहेत. बंडखोर आमदारांनी मतदार संघात पोहचताच पत्रकार परिषदा घेत शिवसेनेतील नेत्यांना टार्गेट करण्यास सुरवात केलीये. शिंदे गटातील नेत्यांच्या निशाण्यावर सध्या शिवसेना खासदार संजय राऊत आहेत. आमदारानंतर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

श्रीकांत शिंदे म्हणाले कि, सर्व आमदार गुवाहाटी येथे असताना कोण रिक्षा वाला, कोण टपरीवाला म्हणाले तर म्हणाले आम्ही रेडे पाठवले आहेत असंही काहीजण म्हणाले. पण ही आपली संस्कृती नाही. आज त्याच कामाख्या देवीने कोणाचा बळी घेतला? असा प्रश्न उपस्थित करत श्रीकांत शिंदे यांनी राऊतांना टोला लगावला. तसेच आपण जो निर्णय घेतला त्याच्या मागे जनता आहे, काही लोकांनी वलग्ना केल्या की, जेव्हा हे आमदार येतील तेव्हा त्यांचे लोक कशा पद्धतीने स्वागत करतील, जे कधी नगरसेवक आणि आमदार निवडून आणू शकत नाही ते वलग्ना करत आहेत असा टोला देखील त्यांनी लगावला.

दरम्यान, काल संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली, त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही. संजय राऊत यांनी पक्षांमध्ये वेळोवेळी केलेली ढवळाढवळ आणि आमदारांना दिलेली दुजाभावची वागणूक याचं घटनेला विरोध करत 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. पैसे घेतल्याचा पुरावा द्यावा राजकारण सोडुन घरी बसेन. त्यामुळे आम्ही संजय राऊतांच्या कोणत्याही वक्तव्याला जास्त किंमत देणार नाही, असे देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!