🕒 1 min read
मुंबई : मंगळवारी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना पक्ष कार्यालयात आम्ही तयार होतो मात्र, मुख्यमंत्री शिवसेना पक्ष कार्यालयात आलेच नाही. ते स्वतःला शिवसैनिक म्हणुन घेतात. आम्ही शिवसैनिक आहेत असे ते वारंवार सांगतत, पण आम्ही त्यांच्यासाठी पुष्पहार घेऊन थांबलो होतो, मात्र ते आलेच नाहीत. तर दुसरीकडे महानगरपालिका मुख्यालयातील भाजपच्या कार्यालयाला भेट देऊन ते निघून गेले, असा टोला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी लगावला.
राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाला भेट दिली. मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर ते मुख्यालयातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात न जाता भाजपाच्या कार्यालयात गेले. यावरून सध्या पालिकेत चांगलेच राजकीय वातावरण तापले असून चर्चांना उधाण आले आहे.
माझी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन विभागाला भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डीवचले आहे. ‘मुख्यमंत्री दुपारी येणार असे आम्हाला कळले होते. त्यामुळे आम्ही पुष्पहार घेऊन त्यांची वाट बघत होतो. पण त्यांना यायला उशीर झाला. ते आले तेव्हा शिवसेना कार्यालयात कोणी नव्हते म्हणून ते आले नसतील, तर कार्यालयात शिवसेनाप्रमुखांची, छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे, तेथे येऊन ते नतमस्तक होऊ शकले असते,’अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या हंगामात मुंबईतील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागतो आणि जाग्यावर मोठ्या प्रमाणावर पाणीही साचते. मात्र यंदा पावसाळ्यात मुंबईतील पाणी साचणारी ठिकाणे कमी झाली आहेत. काही ठिकाणी पाणी साचले, परंतु तेवढ्याच जलदगतीने पाण्याचा निचराही झाला हे शिवसेनेचे यश आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
