Share

SL vs AUS : नॅथन लायननं रचला मोठा विक्रम; कपिल देव यांना टाकले मागे!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महान ऑफस्पिनर नॅथन लायनच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात (SL vs AUS) श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला. गॉल कसोटीच्या तिसर्‍या दिवशी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या ४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने अवघ्या ४ चेंडूत हे लक्ष्य गाठले. गॉल कसोटीत श्रीलंकेचे दोन्ही फलंदाज दोन्ही डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर नतमस्तक झाले. श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात २१२ धावांवर तर दुसऱ्या डावात केवळ ११० धावांवर गारद झाला होता. श्रीलंकेचे फलंदाज नॅथन लायनसमोर असहाय्य दिसले. लायनने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात चार श्रीलंकेच्या खेळाडूंची शिकार केली. यासोबतच लायनने भारताचा महान अष्टपैलू कपिल देव यांनाही मागे टाकले आहे.

नॅथन लायनच्या नावावर आता १०९ कसोटी सामन्यांमध्ये ४३६ विकेट्स आहेत. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी १३१ सामन्यात ४३४ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय कसोटी क्रिकेटमधील टॉप १० गोलंदाजांच्या यादीत लायनचाही समावेश झाला आहे.

लायन व्यतिरिक्त, दिवंगत शेन वॉर्न (७०८ विकेट) आणि ग्लेन मॅकग्रा (५६३) यांचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. या यादीत वॉर्न दुसऱ्या तर मॅकग्रा १२व्या क्रमांकावर आहे. लायनला आता दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि भारतीय फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन यांना मागे टाकण्याची संधी आहे. डेल स्टेनच्या नावावर ९३ टेस्ट मॅचमध्ये ४३९ विकेट्स आहेत तर अश्विनने ८६ टेस्ट मॅचमध्ये ४४२ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन आठव्या तर स्टेन नवव्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!