🕒 1 min read
मुंबई : जवळपास १० दिवस शिवसेनेच्या अनेक आमदारांसह ‘बंडखोर’ झालेले शिंदे यांनी आता भाजपसोबत जात ही राजकीय लढाई जिंकली आहे. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. यानंतर काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
एका बाजूला शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेने नव्या राज्य सरकार विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. कालचा शपथविधी सोहळा बेकायदेशीर असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल राजभवनामध्ये शपथ घेतली. हा शपथविधी बेकायदेशीर असल्याचं सांगत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली. मात्र सुप्रीम कोर्टाने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.
सुप्रीम कोर्टात १६ आमदारांवरील निलंबनाची कारवाई देखील प्रलंबित आहे. अशातच सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची बेकायदेशीर शपथविधी सोहळ्याप्रकरणी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. नव्याने स्थापन झालेल्या सरकारला आता राज्यपालांच्या निर्देशानुसार बहुमत सिद्ध करावे लागणारं आहे. यासाठी राज्यपालांनी २ किंवा ३ जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या सूचना दिल्या होत्या . मात्र आता या संदर्भात होणार अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
