Share

“…हे बाप लेकाला कळलेच नाही” ; सदाभाऊंचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर अखेर महाविकास आघाडीला उद्या बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेच्या सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे. विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या म्हणजेच ३० जून रोजी बोलावण्यात यावे, असे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार हे निश्चित. यावर महाराष्ट्र विकास आघाडीने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सायंकाळी पाच वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून येत्या काही तासांत राज्यातील राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट होईल. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी संधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

“अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना हे राष्ट्रवादी सेना कधी झाली. हे बाप लेकाला कळलेच नाही,” असे ट्वीट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी देखील महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. “हा संपला तो संपला म्हणणारे स्वतःच संपले.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासंदर्भातील पत्र पाठवले आहे. यावरच भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी देखील उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. “सत्तेच्या मोहापाई हिंदुत्व गेल, मंत्री गेले, आमदार गेले. लोकशाहीत बहुमत असाव लागत जे आज नाही, आता तरी मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडून राजीनामा देत लोकभावनांचा आदर राखायला हवा.”, असे ट्वीट करत केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!