Share

Nilesh Rane : “हा संपला तो संपला म्हणणारे स्वतःच संपले”, निलेश राणेंनी ‘मविआ’ला डिवचले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महाविकास सरकारवर सध्या ‘करा किंवा मरा’ अशी परिस्थिती ओढवली आहे. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात ४० हून अधिक शिवसेना नेते असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच या आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबाही काढून घेतला आहे. या परिस्थितीमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना याची दाखल घेण्याची मागणी केली असून राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

महाविकास आघाडी सरकारला उद्याच अर्थात ३० जून रोजी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मविआ सरकारला टोला लगावला आहे. “हा संपला तो संपला म्हणणारे स्वतःच संपले.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान शिवसेनेने बहुमताच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सदरील आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यातच तुरुंगात बंद असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी उद्या महाराष्ट्रातील फ्लोर टेस्टला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली आहे. सुप्रीम कोर्टाने आज संध्याकाळी त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!