मुंबई : अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) हे जोडपं सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका अरोरा पार्ट्यांची किती शौकीन आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मलायका दरवर्षी अर्जुन कपूरचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करताना दिसते. नुकताच अर्जुनने त्याचा ३७ वा वाढदिवस मलायकासोबत पॅरिसमध्ये साजरा केला. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यावेळी मलायकासोबत एक फोटो शेअर करत अर्जुनने तिला चोर म्हटले आहे.
अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोट शेअर केला आहे. फोटोमध्ये अर्जुनने निळ्या रंगाची हुडी परिधान केलेली दिसत आहे. आणि फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “सकाळी त्याचं असतं आणि संध्याकाळी तिचं होतं.” याशिवाय अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून मलायकासोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “चोर, फोटो चोर आणि हूडी चोर…”.
https://www.instagram.com/p/CfVyjeBI4h2/

दरम्यान, अर्जुन कपूर शेवटी सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिससोबत ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसला होता. आता अर्जुन कपूर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

