Share

BJP VS Shiv Sena : भाजप म्हणतेय “फडणवीस पुन्हा येणारच”; म्हणजे शिवसेनेची अस्थिरता राजकीय षडयंत्र?

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेला सुरुवात झाली ती विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, निकाल लागताच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेलाच धोका देत बंडखोरी केली. त्यांच्या पाठोपाठ इतर सेना नेत्यांनीही शिंदेंच्या पाऊलावर पाऊल ठेवत सेनेशी बंडखोरी केली. या बंडखोरीमुळे सेनाच नाही तर मविआ सरकारलाही मोठा धक्का बसला आहे. इतका मोठा धक्का कि, आज सरकार बहुमत सिद्ध करण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे. मात्र यात भाजपचा काय संबंध? तर भाजपच्या अनेक नेत्यांनी या बंडखोरीला समर्थन दिले. या दिवसापासून भाजपकडून अनेक दावे-प्रतिदावे केले गेले.

अनेक राजकीय नेत्यांनी तसेच राजकीय समीक्षकांनी या सर्व घडामोडीमागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचे म्हटले आहे. त्यातच आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी “फडणवीस पुन्हा येणारच” असे ट्वीट करत जणू भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणाच केलेली दिसून येते. “हारी बाजी को जितना जीसे आता है वो देवेंद्र ही दोस्तों कहलाता है… पुन्हा येणार, येणारच.”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

एकनाथ शिंदेंची भाषा ‘भाजप’ची- निखील वागळे 

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली आहे. “एकनाथ शिंदे आता थेट भाजपची भाषा बोलायला लागले आहेत. त्यांची निवेदनं, सोशल मिडिया भाजपवाले लिहित असावेत असा संशय येतो. फडणवीस, किती काळ लपणार तुम्ही?”, असा टोला लगावत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

एकनाथ शिंदे यांचे ट्वीट-

“मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.”, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाकरे-शिंदेंच्या सत्तासंघर्षामध्ये भाजप मैदानात; राज्यपालांना पत्र- 

राज्यात सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. 30 जून रोजी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला बोलावावे, असं पत्र फडणवीसांनी दिले आहे. या पत्रावर राज्यपालांनी लगेच भूमिका घेतलेली आहे.

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र-

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले असून यासाठी फक्त आजचा दिवस शिल्लक आहे. उद्या (३० जून) मविआ सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

बहुमताच्या निर्णयावर शिवसेनेची कोर्टात धाव-

शिवसेनेने बहुमताच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सदरील आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान “आम्ही उद्या मुंबईत पोहोचणार आहोत. आमच्याकडे ५० आमदार आहेत. दोनतृतियांशपेक्षा जास्त बहुमत आमच्या शिवसेना गटाकडे आहे. त्यामुळे उद्या बहुमत चाचणीत आम्ही पास होणार आहोत. आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी देखील आम्ही जाणार आहे. लोकशाहीत संख्या महत्त्वाची असते. या देशात राज्यघटना आणि कायद्याच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही.” असा इशारा आज एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची मांडोळी आतापासूनच बांधली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेनेची अस्थिरता राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!