मुंबई : आलिया भट्टने प्रेग्नेंसीची घोषणा केल्यापासून चाहत्यांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती. आलिया भट्ट सध्या लंडनमध्ये तिच्या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आणि तिथून तिचा सुंदर फोटो समोर आला आहे. यामध्ये आलियाच्या चेहऱ्यावर आई बनण्याची चमक स्पष्ट दिसत आहे.
आलिया भट्ट सध्या लंडनमध्ये तिच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तिथून तिचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत तिच्यासोबत मनीष मल्होत्रा आणि करण जोहर दिसत आहेत. आलियाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. आणि तिने काळा गॉगल घातला आहे.

दरम्यान, या दोघांना रणबीर कपूरची बहीण रिधिमा कपूर, आलियाची आई त्याचबरोबर अभिनेत्री परिणीती चोप्रा, प्रियांका चोप्रा, करण जोहर, टायगर श्रॉफ, वाणी कपूर, रकुल प्रीत सिंग, मौनी रॉय यांसारख्या कलाकारांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्टने 14 एप्रिल रोजी लग्न केले होते. यांचे लग्न मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या ‘वास्तू’ बंगल्यावर झाले होते. रणबीर-आलियाने साधेपणानं केलेल्या लग्नाची खूप चर्चा झाली होती.
महत्वाच्या बातम्या :


