🕒 1 min read
मुंबई : भारत आणि आयर्लंड (IRE vs IND ) यांच्यात डब्लिन येथे मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने या दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी कायम ठेवली आहे.
मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पावसामुळे केवळ १२-१२ षटकांचा खेळ होऊ शकला होता. आयर्लंडने १२ षटकांत ४ गडी गमावून १०८ धावा केल्या, त्यानंतर भारतीय संघाने ९.२ षटक आणि ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. आजच्या सामन्यात भारताने संजू सॅमसन, हर्षल पटेल आणि रवी बिश्नोई यांना संधी दिली आहे.
Hardik Pandya calls it right at the toss and we will bat first against Ireland in the 2nd T20I.
Live – https://t.co/l5jcWYMcNk #IREvIND pic.twitter.com/rYyZD6EMhZ
— BCCI (@BCCI) June 28, 2022
दोन्ही संघांची Playing 11
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कप्तान), गॅरेथ डेलनी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेयर, अँडी मॅकब्राईन, क्रेग यंग, जोशुआ लिटल, कोनर ओल्फर्ट
भारत : संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कप्तान), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, उमरान मलिक.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
