Share

सुशीलकुमार शिंदे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार? तातडीने दिल्लीत दाखल!

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : भारतचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत २४ जुलै रोजी संपणार आहे. आता २९ जूनपर्यंत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज करावा लागणार आहे. १८ जुलै रोजी मतदान पार पडणार आहे तर २१ जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दर्शिविल्यानंतर सर्वसमावेशक असा सर्वांना मान्य होईल असा चेहरा म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्याकडे पाहिले जात आहे. शिंदेंना दिल्लीतून निरोप आल्यानंतर शिंदे हे तातडीने दिल्लीला पोहचले असून आता त्यासंदर्भात आता बैठक सुरु आहे.

राष्ट्रपदीपदासाठी निवडणूकीसाठी भाजपकडूनही अनेक इच्छुक आहेत, पण त्यांची नावे अजून जाहीर करण्यात आलेली नाहीत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, व्यंकया नायडू, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. विरोधकांकडून सर्वसमावेश आणि सर्वांना मान्य होईल असा चेहरा शोधला जात आहे. काँग्रेस समितीतर्फे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीचे निमंत्रण आले आहे. रविवारचे सर्व कार्यक्रम रद्द करून ते आज दिल्लीत दाखल झाले आहेत.

सुशिलकुमार शिंदे हा चेहरा काँग्रेसला आश्वासक वाटत आहे. दरम्यान २००२ मध्ये भैरोसिंग शेखावत यांच्याविरूद्ध उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी सुशीलकुमार शिंदे यांना मिळाली होती. तेव्हा मतांच्या गणितात शेखावत विजयी होणार हे निश्चित होते. तरीही शिंदे यांनी पक्षाचा आदेश मानून उमेदवारी अर्ज भरला होता. आताही राष्ट्रपतीपदासाठी भाजप देईल, तोच उमेदवार विजयी होणार हे स्पष्ट आहे. तरीदेखील, या निवडणुकीत शिंदे हेच राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!