Share

Fathers Day : सचिन तेंडुलकरला आली वडिलांची आठवण, शेअर केली भावनिक पोस्ट; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जगभरातील लोक आज म्हणजेच १९ जून २०२२ रोजी ‘फादर्स डे’ साजरा करत आहेत. भारताचा दिग्गज क्रिकेटपटूही सचिन तेंडुलकरही यामध्ये मागे नाही. सचिननेही फादर्स डे च्या दिवशी त्यांच्या वडिलांची आठवण काढली आहे. सचिन क्रिकेटर होण्यात त्याच्या वडिलांचे योगदान किती आहे हे सर्वांनाच माहीत आहे. याचा त्यांनी अनेकदा उल्लेखही केला आहे. मात्र फादर्स डेच्या निमित्ताने सचिनने मराठी कादंबरीकार असलेले वडील रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिनने वडिलांसोबतचे नाते, त्यांनी शिकवलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. व्हिडिओमध्ये सचिनची आईही दिसत आहे. सचिनच्या वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अनेक खास गोष्टीही त्याने शेअर केल्या आहेत.

ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना सचिनने लिहिले की, “प्रत्येक मुलाचा पहिला हिरो त्याचे वडील असतात. यामध्ये मी काही वेगळा नव्हतो आणि आजही मी असेच मानतो आहे. त्यांची शिकवण, त्यांचे प्रेम आणि त्यांनी मला माझा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य कसे दिले हे मला अजूनही आठवते. सर्वांना फादर्स डेच्या शुभेच्छा.”

सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला, “वडिलांनी मला नेहमीच शिकवले की आयुष्यात कधीही शॉर्टकट घेऊ नका. कोणत्याही आव्हानासाठी आणि ध्येयासाठी नेहमी स्वत:ला अधिक चांगले तयार करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जीवनातील मूल्ये कधीही सोडू नका.” सचिनला वडिलांचे हे शब्द आजही आठवतात आणि तो आपल्या आयुष्यात अंगिकारण्याचा प्रयत्न करतो.

वडिलांनी सचिनवर कधीही आपली इच्छा लादली नाही

या व्हिडिओमध्ये सचिनच्या आईने म्हटले आहे की, वडिलांनी कधीही सचिन किंवा इतर मुलांवर आपली इच्छा लादली नाही. म्हणूनच जेव्हा मुलं त्यांच्या वडिलांसोबतची त्यांची जुनी छायाचित्रे पाहतात तेव्हा त्यांना वडील काय होते याची कल्पना येते. त्यामुळे वडील रमेश यांच्या निधनानंतरही सचिन आणि त्याच्या इतर भावांनाही त्याची आठवण येते. या व्हिडिओच्या शेवटच्या भागात सचिनने एक पाळणा दाखवला ज्यावर त्याचे वडील त्यांना घेऊन बसायचे. हा पाळणा सचिनसाठी खास आहे आणि जुना असूनही त्यांनी त्यास नवीन स्वरूप दिले आणि आजही ते वापरतात.

वडिलांच्या निधनानंतर विश्वचषकात शतक झळकावले

सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात एक वेळ अशी आली, जेव्हा वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच तो मैदानावर खेळायला उतरला होता. तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. १९९९ मध्ये सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले आणि तो त्यावेळी इंग्लंडमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळत होता. त्यावेळी भारतीय संघाने दोन सामने गमावले होते. त्यानंतर तो भारतात परतला आणि वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर पुन्हा इंग्लंडला रवाना झाला. तेथे जाऊन त्याने केनियाविरुद्ध शतक झळकावून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!