Share

मग अग्निविरांच्या पंचायती तुला कशाला?; अतुल भातखळकरांचा कन्हैय्या कुमारला सवाल

Published On: 

मुंबई: केंद्र सरकारनेअग्निपथ योजना जाहीर केल्यानंतर देशभरात तरुणांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते कन्हैय्या कुमारने या योजनेला विरोध करत केंद्र सरकावर निशाणा साधला. योजना लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने तरुणांशी संवाद साधला का, विरोधकांशी चर्चा केली का, असा सवाल कन्हैय्या कुमारने केला आहे. यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“अग्नीपथमध्ये ४ वर्षे नोकरी करुन परतल्यानंतर पोरगी कोण देणार?, ‘अग्निपथ’वर कन्हैय्या कुमारचा सवाल. JNU मध्ये १०/१२ वर्षे शिक्षण घेऊनही अजून तुला कोणी मुलगी का दिली नाही? मग अग्निविरांच्या पंचायती तुला कशाला?”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान “सैन्यदलात गृहमंत्र्यांचा मुलगा नाही जात तर बीसीसीआयचा सचिव बनतं. तेथे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं भरती होतात. अनुभवातून सांगतोय ही योजना तरुणाईच्या हिताची नाही. बिहारमधील बेरोजगारी समस्या गंभीर आहे. सैन्यात भरती नसेल तर तरुणांचे लग्न होत नाहीत. एखादा तरुण निवृत्त होऊन 21 व्या वर्षी घरी आल्यास त्याला लग्नासाठी मुलगी कोण देईल?”, असा सवाल कन्हैय्या कुमारने केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!