Share

“मोदीद्वेषाने पछाडलेले तरुणांची माथी भडकवत आहेत” ; अग्निपथवरून केशव उपाध्येंचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : लष्करातील सैन्यभरतीबाबतच्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) आता देशभरातून विरोध होत आहे. या योजनेवरून देशात सर्वत्र गदारोळ सुरू झाले आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी सैन्य भरती अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. एका राज्याचे पडसाद दुसऱ्या राज्यातही उमटत आहेत. देशाच्या विविध भागात विद्यार्थ्यांकडून निदर्शने होत आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. उत्तर भारत, उत्तरप्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा इत्यादी राज्यात आंदोलनाचे लोण पसरले आहे. ही योजना मागे घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे. याबाबत काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन या योजनेवर टीका केली हाती. यॊजना मागे घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. मात्र आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अग्निपथ योजनेवर केलेल्या विरोधकांच्या टिकेला तरुणांनी बळी पडू नये असे आवाहन केले आहे, तसेच अग्निपथ योजनेचे फायदे आणि आवश्यकता आपल्या फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे.

केशव उपाध्ये आपल्या पोस्ट मधून म्हणतात, “मोदीविरोधातूनअग्नीपथविरोध. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील राष्ट्रप्रेमी तरुणांना केवळ रोजगाराच्या नव्हे, तर देशसेवेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशांतर्गत दहशतवाद, नक्षलवादी कारवाया आणि परकी शक्तींनी पुकारलेले छुपे युद्ध अशा अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी तरुणांना सिद्ध करणाऱ्या या योजनेस विरोध करण्याकरिता राजकीय विरोधकांनी देशात तरुणांची माथी भडकावण्याचे काम सुरू केले आहे. केवळ मोदी सरकारच्या एका महत्वाकांक्षी योजनेस अपशकुन करण्यासाठी राजकीय विरोधक कोणत्या थराला जातात याचेच हे उदाहरण असून तरुणांनी अशा चिथावणीस बळी पडू न पडता या योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या उत्कर्षाच्या या नव्या संधीचे स्वागत करणे गरजेचे आहे.

या योजनेमुळे देशाच्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करणे शक्‍य होणार आहे. सैनिकी प्रशिक्षणाच्या नव्या महत्वाकांक्षी माध्यमातून भारताच्या संपूर्ण संरक्षण सज्जतेमध्ये युवकांचे महत्वाचे योगदान घडविणारी आणि अशा कुशल तरुणांचा एक मोठा समूह तयार करणारी ‘अग्निपथ’ ही योजना म्हणजे एक परिवर्तनकारी पाऊल आहे. तसेच युव‍क कौशल्य आणि अनुभवाने स्वतःसाठी करियरच्या अनेक अनोख्या संधी निर्माण करून अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लावू शकणार आहेत. कारण या योजनेमुळेच तरुणांना सैन्यातील नोकरीबरोबरच, आपल्या भविष्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी गरजेच्या असलेल्या अनेक अतिरिक्त कौशल्यांचे प्रशिक्षणही मिळणार आहे. अग्निपथ योजनेत सहभागी होणाऱ्या तरुणांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणामुळे अर्थव्यवस्थेत नव्याने निर्माण होत असलेल्या उद्योजकता आणि नोकऱ्यांच्या अनेक संधींचा पाठपुरावा करणे शक्य होणार आहे.

मोदीद्वेषाने पछाडल्यामुळे केवळ राजकीय विरोधासाठी अपशकुन करणाऱ्यानी या योजनेविषयी विकृत गैरसमज पसरवून तरुणांची माथी भडकावण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मुळात, चार वर्षांच्या सेवाकाळानंतर मुक्त होणाऱ्या तरुणांचे भविष्य असुरक्षित होईल या आक्षेप निरर्थक ठरतो, हे वरील स्पष्टीकरणावरून सिद्ध होते. उलट, असे प्रशिक्षण घेतलेल्या अग्निवीरांना प्राप्त होणाऱ्या कौशल्यामुळे भविष्यातील संधींचा प्राधान्याने फायदा मिळणार आहे. साधारणपणे तरुणांच्या करियरची सुरवातच वयाच्या २०-२२ व्या वर्षानंतर सुरू होत असते. याआधी अग्निवीर म्हणून सेवाकाळ पूर्ण केलेल्या तरुणांच्या हाती भविष्य घडविण्यासाठी किमान ११ लाखांची स्वतःची पुंजी आलेली असेल, शिवाय त्यांना त्यांच्या भविष्यातील स्वप्नांसाठी पॅकेजच्या स्वरूपात अर्थसाह्य मिळणार असल्याने, करियरच्या सुरुवातीचे आर्थिक अडथळे पार झालेले असतील. ज्यांना सेवाकाळात आपले औपचारिक शिक्षण पूर्ण करावयाचे असेल, त्यांना ती संधी मिळणारच आहे. शिवाय, ही सेवा पूर्ण केल्यानंतर संरक्षण यंत्रणांमधील नोकऱ्यांमध्ये त्यांना प्राधान्याने संधी मिळणार आहे.

अग्निवीर हे सामाजिक सुरक्षिततेचा धोका ठरेल हा तरुणांच्या राष्ट्रनिष्ठेवर संशय घेणारा निरर्थक आक्षेपही पोटदुखी झालेले विरोधक घेताना दिसतात. कारण या काळात मिळणारे प्रशिक्षण हे देशप्रेमाचे, राष्ट्रनिष्ठेचेच असणार आहे. असा आक्षेप घेणे म्हणजे, सैन्यदलाच्या निष्ठेवरच संशय आणि गैरसमज परसविणे आहे. सैन्यदलातून निवृत्त झालेले हजारो जवान त्यांच्या कौशल्याच्या बळावर आजही देशसेवेसाठी निष्ठेने काम करत असून समाजविघातक कारवाया मोडून काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेच दिसत असताना असा आक्षेप घेणारे विरोधक तरुणांच्या राष्ट्रप्रेमावरच शंका उपस्थित करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!