Share

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी केएल राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळू शकते संघात संधी

Published On: 

मुंबई : इंग्लंड दौऱ्याअगोदर दुखापातीने ग्रासलेल्या केएल राहुल कसोटी संघातून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी भारताचा सलामीवीर आणि पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालला संघात संधी दिली जाऊ शकते. मयंक १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात सहभागी होण्यासाठी तो सज्ज आहे. पाठीच्या दुखापतीमुळे राहुल इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला असून उपचारासाठी त्याला जर्मनीला जावे लागणार आहे. जर केएल राहुल भारतीय कसोटीचा उपकर्णधार असेल तर त्याच्या जागी ऋषभ पंतला उपकर्णधार बनवले जाऊ शकते. पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. रविवारी १९ जूनला शेवटच्या टी-२० सामन्यानंतर पंत सहकारी खेळाडूंसोबत इंग्लंडला रवाना होणार आहे.

इनसाइडस्पोर्टने बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मयंकला इंग्लंड दौऱ्यासाठी स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही संघ व्यवस्थापनाला विचारले आहे की त्यांना केएल राहुलच्या बदलीची गरज आहे का. त्यामुळे याचे १९ तारखेपर्यंत उत्तर मिळावे.” अशा परिस्थितीत मयंक दुसऱ्या तुकडीसह इंग्लंडला जाणार आहे. मात्र अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. ऋषभ पंत या एका कसोटी सामन्यासाठी संघाचा उपकर्णधार असेल. मात्र, बीसीसीआयने अद्याप पंत आणि मयंक यांच्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

२४-२७ जून: लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब, चार दिवसीय सराव सामना
१ जुलै: भारत अ विरुद्ध डर्बीशायर, टी-२०
१-५ जुलै: भारत विरुद्ध इंग्लंड, 5वी कसोटी , बर्मिंगहॅम
३ जुलै: भारत अ विरुद्ध नॉर्थम्प्टनशायर

भारत-इंग्लंड टी-२० मालिका

पहिला सामना – ७ जुलै, साउथम्प्टन
दुसरा सामना – ९ जुलै, बर्मिंगहॅम
तिसरा सामना – १० जुलै, नॉटिंगहॅम

भारत-इंग्लंड वनडे मालिका

पहिला सामना – १२ जुलै, केनिंग्टन ओव्हल
दुसरा सामना – १४ जुलै, लॉर्ड्सचा
तिसरा सामना – १७ जुलै, मँचेस्टर

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.

स्टँड बाय प्लेअर: मयंक अग्रवाल

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!