Share

वसीम जाफरने ट्विटरवर लुटली व्वा! व्वा! मजेदार मीम्सने जिंकली चाहत्यांची मने; एकदा पाहाच!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी शुक्रवारचा दिवस अतिशय मनोरंजक असा ठरला. कारण एकीकडे भारतीय क्रिकेट संघाने राजकोटमध्ये मालिकेतील चौथ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. तर दुसरीकडे इंग्लंडने शुक्रवारी यजमान नेदरलँड्सविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. दिनेश कार्तिकच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाहुण्या संघाला १७० धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर आवेश खानने इतर गोलंदाजांसह संपूर्ण दक्षिण आफ्रिका संघाला ८७ धावांत गुंडाळूले. टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे.

नेदरलांड विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने तीन फलंदाजांच्या शतकी खेळीमुळे ४ विकेट गमावून ४९८ धावा केल्या. फिलिप सॉल्ट (१२२ धावा), डेव्हिड मलान (१२५ धावा) आणि जोस बटलर (नाबाद १६२) यांनी इंग्लंडला विश्वविक्रम (सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या) करण्यात मदत केली. इऑन मॉर्गनच्या नेतृत्वातील या संघाने नेदरलँड्सला २६६ धावांत गुंडाळून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजयही नोंदवला आहे.

अशाप्रकारे १७ जून या दिवशी चाहत्यांच्या मनोरंजनासाठी क्रिकेट विश्वात अनेक घडामोडी घडल्या. भारताचा माजी दिग्गज फलंदाज वसीम जाफरने काही ट्विट करून चाहत्यांच्या मनोरंजनात भर घातली आहे. आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखला जाणारा जाफरने या दोन्ही सामन्यांमध्ये घडणाऱ्या क्रमांवर सतत मीम्स पोस्ट केले आहेत. जे पाहून तुम्ही तुमचे हसू रोखू शकणार नाही.

राजकोटमध्ये दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या यांच्या शानदार भागीदारीवर त्याने हे ट्विट केले आहे. कार्तिक आणि पंड्याने पाचव्या विकेटसाठी ६५ धावा जोडल्या, ज्यामुळे भारताची धावसंख्या मजबूत झाली.

चौथ्या सामन्यात भारतीय संघाच्या विजयासह मालिकेत आता २-२ अशी बरोबरी झाली आहे. रविवारी होणारा शेवटचा टी-२० सामना मालिकेचा विजेता ठरवेल. यावर जाफरने कॅप्टन पंतसंबंधीत ट्विट शेअर केले.

ॲमस्टेलवीनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन (० धावा) आणि सलामीवीर जेसन रॉय (१ धाव) यांनी निराशाजनक खेळी खेळली. त्याचवेळी त्याच्या सहकारी फलंदाजांनी शतके झळकावली. यावर एक मजेदार अँगल घेत जाफरने हा मीमही शेअर केला आहे, ज्याला ट्विटरवर प्रचंड पसंती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!