Share

“तरूणांनो हिंसा, जाळपोळ करू नका” ; ‘अग्निपथ’च्या पार्श्वभूमीवर कन्हैया कुमारांचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या लष्करातील सैन्यभरतीबाबतच्या अग्निपथ या महत्वाकांक्षी योजनेला (Agnipath Scheme) आता देशभरातल्या विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. या योजनेवरून सर्वत्र गदारोळ सुरू झाले आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. एका राज्याचे पडसाद दुसऱ्या राज्यातही उमटत आहेत. देशाच्या विविध भागात विद्यार्थ्यांकडून निदर्शने होत आहेत. आता अग्निपथ योजनेबाबत विरोधी पक्षांकडूनही विरोध केला जात आहे. यावर काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी भाष्य केले आहे.

“बिहारमधील बेरोजगारीचा दर हा इतरांपेक्षा दुप्पट आहे. इथल्या तरुणांकडून संधी हिसकावून घेतल्या जात आहेत, पंतप्रधान आम्हा लोकांना पिंजऱ्यात ठेवलेले उंदीर समजतात. हा देश गांधींचा देश आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात लष्कर भरतीच्या आंदोलनाला काँग्रेस पाठिंबा देत असल्याचे काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार म्हणाले.

अग्निपथच्या विरोधात देशभर तीव्र हिंसक आंदोलन होत आहे, जागोजागी जाळपोळ आणि तोडफोड होत आहे. या पार्श्वभूमीवर कन्हैया कुमार यांनी तरुणांना हिंसा आणि जाळपोळ न करण्याचे आवाहनही केले आहे. तसेच, सरकारने ही योजना लवकरात लवकर मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!