Share

“अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधणार, योगी आदित्यनाथांकडे जागा मागणार” ; आदित्य ठाकरेंची माहिती!

Published On: 

🕒 1 min read

अयोध्या :  शिवसेना नेते व महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज अयोध्येत त्यांनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी ही आमची तीर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नाही, इथे राजकारण करायला आलेलो नाही, तर रामलल्लाचं दर्शन घ्यायला आलो आहे, असे सांगितले. तसेच, अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी निर्माण करण्यासाठी जागा मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही आदित्य ठाकरेंनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची देखील उपस्थिती होती.

आदित्य ठाकरे म्हणाले, “मागील तीन-चार वर्षाच्या काळात अयोध्येत चौथ्यांदा येत आहे. परंतु उत्साह, जल्लोष तोच आहे, तसाच आहे. राम मंदिर निर्माण होत असताना अजून उत्साहाने अनेक शिवसैनिक महाराष्ट्र, उत्तर प्रदेश किंवा अन्य राज्यांमधून हे अयोध्येत आलेले आहेत. रामजन्मभूमीत रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. मी सर्व माध्यमांना हीच विनंती करतो की, आमच्यासोबत जो उत्साह, जल्लोष आहे त्याचं देखील थोडं चित्रीकरण करावं आणि देशाला दाखवाव. कारण, हा एक वेगळा विषय आहे.”

तसेच, “२०१८ मध्ये मी पहिल्यांदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी इथे आलो होतो आणि तेव्हा त्यांनी घोषणा केली होती, की पहले मंदिर फिर सरकार. न्यायालयाच्या निकालामुळे आज इथे मंदिर निर्माण होत आहे. आम्ही न्यायालयाचे आभार मानतो. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे, की आज इथे दर्शन तर घ्यायला आलेलोच आहोत. आपल्या मनात कदाचित प्रश्न असतीलच पण त्याचं एकच उत्तर आहे, हे जे काही आमचं इथे येणं आहे, ही आमची तीर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नाही. इथे राजकारण करायला आलेलो नाही, दर्शन घ्यायला आलेलो आहे.” असंही आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “महत्वाची गोष्ट म्हणजे आज इथे आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की ते स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी याबाबत बोलणार आहेत. पत्रव्यवहार करणार आहेत आणि या अयोध्येत, या पवित्रभूमीत महाराष्ट्र सदनासाठी देखील जागा मागणार आहेत. साधारणपणे १०० खोल्यांचं किंवा जास्त जमेल, असं महाराष्ट्र सदन आम्हाला इथे बनवायचं आहे. महाराष्ट्रातून इथे अनेक भाविक येत असतात. त्यांना राहण्यासाठी एक चांगली जागा इथे निर्माण कराची आहे.” अशी माहिती यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!