🕒 1 min read
जालना : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात जालन्यात जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जालना भाजपाने या मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभेला संबोधीत केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी जोरदार निशाणा साधाला.
“129 कोटी रुपये जालन्याच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी आमच्या सरकारने दिले. पण काम ठप्प! महाविकास आघाडीचे सरकार एकच काम करते. आमच्या सरकारच्या काळात आणलेल्या योजनांना स्थगिती आणि स्थगिती न दिलेल्या उर्वरित योजना/कामांचे उद्घाटन करणे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“हे सरकार सत्तेत, मालपाणी कमाविण्यात, वसुलीत खुश आहेत. जनतेच्या दु:खाशी काहीच लेनदेन नाही. सत्ता टिकविणे, हेच त्यांचे एकमेव ध्येय आहे. या राज्यात सरकार आहेच कुठे? मुख्यमंत्री ‘कार’ चालवितात आणि भगवान सरकार चालविते”, असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला.
हे सरकार पाण्याचे शत्रू आहे-
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठवाड्यातील एकाही शहराला पाण्याच्या अडचणी येऊ नये, म्हणून आम्ही वॉटरग्रीडची योजना तयार केली. पण, महाविकास आघाडी सरकारने योजनेला निधी देणेच बंद करून टाकले. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या योजनेचा या सरकारने मुडदा पाडला. जलयुक्त शिवार, शेततळे अशा सार्या योजना बंद केल्या. सूक्ष्मसिंचनाच्या योजनांचा खून केला. वैधानिक विकास मंडळ बंद करून टाकले. हे सरकार पाण्याचे शत्रू आहे.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
