Share

“राज ठाकरे चटकन…”, भरत जाधव यांची Instagram Post चर्चेत

Published On: 

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता म्ह्णून भरत जाधव यांना ओळखले जाते. त्यांच्या उत्तम अभिनयशैलीमुळे ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. भरत जाधव हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भरत यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तो पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

पहा भरत जाधव यांची इंस्टाग्राम पोस्ट –

“मा. राजसाहेब ठाकरे..!! खूप वर्षांपासूनची ओळख. मुळात ते राजकारणात जरी सक्रिय असले तरी जेंव्हा कधी आम्ही भेटतो तेंव्हा ते राजकारण या विषयावर अजिबात बोलत नाहीत. मराठी नाटक… मराठी सिनेमा मध्ये सध्या काय चाललंय. जागतिक सिनेमामध्ये सध्या काय चाललंय यावरच सगळ्या गप्पा असतात. सगळ्याच कलाकृतींवर त्यांचं चांगलं निरीक्षण असतं. आपण कुठल्या नवनवीन गोष्टी करायला हव्यात हेही ते सुचवतात.

मध्यंतरी कोरोना काळात केदार त्यांना भेटायला गेला तेंव्हा लॉकडाऊन आणि त्या सर्व गोंधळात नाट्यगृह आणि चित्रपटगृह काही लवकर उघडण्याची चिन्ह दिसत नाहीत म्हणून पुन्हा टेलिव्हिजन करा हे सुचवणारे ही तेच. त्यातुनच पुढे ‘सुखी माणसाचा सदरा’ ची निर्मिती झाली ज्याद्वारे मी टिव्ही वर पुनरागमन केलं.

मुळात त्यांचा स्वभाव असा आहे की ते चटकन कुणाला जवळ करत नाहीत आणि एकदा केलं तर त्याच्यासाठी हवं ते सर्व करण्यासाठी सिद्ध होतात. वेळोवेळी कुठे चुकत असाल तर कानउघाडणी ही करतात आणि चांगलं काम केलं तर मनापासून कौतुकही करतात.

अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वास व दिलदार नेत्यास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!”, ही पोस्ट भरत जाधव यांनी केली आहे

https://www.instagram.com/p/CeyCB4yOeK0/

सध्या भरत जाधव यांची इंस्टाग्राम पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. त्या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. भरत जाधव यांच्या पोस्टवर अनेक लोकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या कमेंट देखील केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!