Share

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे विराट कोहलीबाबत वादग्रस्त विधान; म्हणाला…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आपल्या फलंदाजीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्येही त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने कोहलीच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विराटबद्दल बोलताना आफ्रिदी म्हणाला, “क्रिकेटमध्ये खेळाडूंची वृत्ती सर्वात महत्त्वाची असते. हीच एक गोष्ट आहे ज्याबद्दल मी सर्वात जास्त बोलतो. क्रिकेटबद्दल तुमचा असा दृष्टिकोन आहे की नाही. तो कोहली जो त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात खेळायचा. जगातील नंबर वन खेळाडू बनण्यासाठी तो अजूनही त्याच प्रेरणेने त्याचे क्रिकेट खेळत आहे का.

विराटने यावर्षी ३ कसोटी सामन्यांच्या ५ डावात केवळ १८९ धावा केल्या आहेत. ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या ७९ धावा राहिली आहे. ६ एकदिवसीय सामने खेळल्यानंतर त्याच्या खात्यात २३ च्या सरासरीने १४२ धावा आहेत. ज्यामध्ये ६५ धावा ही त्याची सर्वात मोठी खेळी आहे. टी-२० बद्दल बोलायचे झाले तर त्याने २ सामन्यात ६९ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या १५ व्या हंगामात १६ सामने खेळल्यानंतर कोहलीने ३४१ धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात तो ३ वेळा शून्यावर बाद झाला आणि त्याची सरासरी फक्त २२ राहिली आहे.

आफ्रिदीने कोहलीबाबत वादग्रस्त विधान करताना तो म्हणाला की, ‘आता तो फक्त विश्रांती घेण्याचा आणि वेळ घालवण्याचा विचार करतो. हा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्याकडे क्लास आहे पण त्याला आता पुन्हा नंबर वन खेळाडू व्हायचे आहे का. किंवा त्याला असे वाटू लागले आहे की त्याने आयुष्यात सर्वकाही मिळवले आहे. बस झाले आता आयुष्यात आरामशीर रहा आणि वेळ घालवा हे सर्व केवळ वृत्तीवर अवलंबून असते.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!