Share

IND vs SA 2022 : उमरान मलिकबाबत भारतीय कर्णधार ऋषभ पंतनं केलं मोठं वक्तव्य; म्हणाला…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेचा विषय बनला आहे. भारताकडून खेळण्यापूर्वीच त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. आयपीएल २०२२ मध्ये उमरानची कामगिरी पाहिल्यानंतर आता भारतीय जर्सीमध्येही त्याचा खेळ पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी (IND vs SA) या वेगवान गोलंदाजाची भारतीय संघात निवड करण्यात आहे. उमरान मलिक त्याच्या आक्रमकतेवर नियंत्रण ठेवण्यास शिकत आहे, असे संघाचा कर्णधार ऋषभ पंतने म्हटले आहे. उमरान मलिकने यंदाच्या हंगामात आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना १४ सामन्यांत २२ बळी मिळवले होते. स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर होता.

बुधवारी पत्रकार परिषदेत ऋषभ पंत उमराणबद्दल म्हणाला, “तो आमच्यासाठी एक युवा वेगवान आणि आक्रमक गोलंदाज आहे. पण कालांतराने तो त्याच्या आक्रमकतेवर आणि गोलंदाजीत नियंत्रण कसे ठेवायचे हे शिकेल. त्याने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, पण मला वाटते की भविष्यात आपण त्याला भारतीय संघात यशस्वी होताना पाहू. परंतु मला वाटते की यास वेळ लागेल. म्हणून जोपर्यंत आम्ही एक संघ म्हणून विचार करत आहोत, तोपर्यंत प्रथम आलेल्या खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करू.”

बुधवारी बीसीसीआयने माहिती दिली की, सरावादरम्यान दुखापतीमुळे केएल राहुल या मालिकेतून बाहेर झाला आहे. रोहित शर्माच्या जागी केएल राहुलला या मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले होते. आता तो मालिकेतून बाहेर गेल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी रिषभ पंतच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधार पदी हार्दिक पंड्याला संधी दिली आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयपीएल मध्ये गुजरात टायटन्सने यंदाच्या हंगामात विजेतेपद पटकावले होते.

घरच्या मैदानावर खेळण्यास कर्णधार रिषभ पंत उत्सुक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हे ऋषभ पंतचे घरेलु मैदान देखील आहे. घरच्या मैदानावर चाहत्यांसमोर त्याला कर्णधारपदाची संधी मिळणार आहे. याबाबत तो म्हणाला की, “ही खूप चांगली भावना आहे. विशेषत: जेव्हा तुम्हाला तुमच्या घरेलु मैदानावर कर्णधारपदाची संधी मिळते. आयपीएलमधील कर्णधारपदाचा अनुभव मला खूप उपयोगी पडेल.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!