🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासुन प्राजक्ता माळी सतत चर्चेत आहे. ही अभिनेत्री सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. नुकतीच ‘रानबाजार’ ही तिची मराठी वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. प्राजक्ता माळी सध्या हिमाचल प्रदेशमध्ये सुट्ट्या एण्जॉय करताना दिसत आहे. दरम्यान अभिनेत्रीने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ती पोस्ट खूप चर्चेत आहे.
प्राजक्ताने हिमाचल प्रदेशमधील तिचे वेगवेगळे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत आहे. तिची ही पहिली सोलो ट्रीप आहे. त्यामुळे या ट्रीप दरम्यान तिला महाराष्ट्राची आठवण येत आहे. प्राजक्ताने हिमाचलमधील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “पण खरं सांगू कुठल्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीत जास्त ५ ते ६ दिवस आनंद घेऊ शकते. नंतर (काम नसेल तर) मला महाराष्ट्राची कडकडून आठवण येऊ लागते. हो आत्ताच पळून यावं इतकी आठवण येतेय. देवा…कसं होणार माझं?”
https://www.instagram.com/p/CekxVrmLdwH/
हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन तिला ४ ते ५ दिवस झाले आहेत. तरीपण तिला महाराष्ट्राची आठवण येत आहेत. तिच्या पोस्टवर सोशल मिडिया युजर्सने वेगेवगळ्या कमेंट केल्या आहे. तसेच हिमाचल प्रदेशामधील तिच्या फोटोंच कौतुक देखील केले जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
