अमरावती : हनुमान चालीसावरून आता राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापणार की काय असे संकेत दिसू लागले आहेत. काल ८ जून रोजी औरंगाबाद येथे सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवरून विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच हनुमान चालीसा प्रकरणांवर बोलताना त्यांनी, हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, असे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांचा याच आव्हानाला खासदार नवनीत राणा यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नवनीत राणा यांनी आता उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं आहे. काश्मीर भारताचा भाग आहे आणि तिथे हनुमान चालीसा पठण करणे कठीण आहे, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर मी तिथे जाऊन हनुमान चालीसा पाठ करेन, असे नवनीत राणा इशारा देत म्हणाल्या आहेत. ज्या दिवशी उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करतील, त्या दिवशी मी काश्मीरमध्ये कधी आणि केव्हा हनुमान चालीसा वाचणार याची तारीख व वेळ जाहीर करेल. मंदिर, हनुमान चालीसा पठण आपल्याला महत्वाचे वाटत नसेल, तर तुम्ही स्वत:ला हिंदू म्हणून कसं काय रिप्रेझेंट करू शकता, असे म्हणत नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
काल त्यांनी औरंगाबादच्या जनतेच्या स्थानिक प्रश्नांवर मुख्यमंत्री म्हणून बोलायला हवे होते, पण त्यांनी मलाच काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करा, असे आव्हान दिले. त्यांनी तेथील जनतेच्या समस्यांवर, पाणी प्रश्नावर का नाही चर्चा केली, असा सवाल राणांनी त्यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या –


