🕒 1 min read
मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’ लोकप्रिय शो आहे. सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या विनोदी शैलीने हजारो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणतो. या शोचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणत आहेत. पण चाहत्यांसाठी एक निराशजनक माहिती समोर आली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ काही दिवसासाठी बंद राहणार आहे.
कपिल आणि कपिल शर्मा शोची टीम कामानिमित्त अमेरिकेमध्ये जाणार आहेत. शो मधील कलाकारांनी काही दिवसांसाठी ब्रेक घेतला आहे. म्हणून हा शो काही दिवस बंद राहणार आहे. पण परत एकदा संपूर्ण टीमला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोड्या दिवस वाट पहावी लागणार आहे.
https://www.instagram.com/p/CdxyWAZDPnx/
‘द कपिल शर्मा शो’मध्ये आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली आहे. त्याचबरोबर क्रिकेट क्षेत्रामधील प्रसिद्ध व्यक्तींनी सुद्धा या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमधील किकू शारदा, कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर सारख्या कलाकारांनी प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडलं. आता पुन्हा हा शो कधी परतणार याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
