मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीचे वारे जोराज वाहू लागले आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलीच टक्कर पाहायला मिळत आहे. पंचवार्षिक निवडणूकीपेक्षा जास्त राज्यसभेच्या निवडणूकीला राजकीय नेत्यांनी डोक्यावर घेतले आहे. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही राजकीय खळबळ उडाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर घोडेबाजार करत असल्याचा आरोप केला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, “या निवडणुकीत स्पर्धा व्हायला नको होती. राज्यसभेची निवडणूक सरळ मतं दाखवून असते. पण भाजपने उमेदवार दिल्यामुळे घोडेबाजाराला सुरुवात झाली आहे. अपक्ष आमदारांचा भाव वाढला. मात्र ही सगळी परिस्थिती पाहीली तर महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत आहे.”
शिवसेना आमदार मुंबईत हॉटेल ट्रायडेंटमध्ये
या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांना मुंबईत हॉटेल ट्रायडेंटमध्ये ठेवण्यात आलं आहे. यावर शिवेसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले, “राज्यसभेसाठीची मतदानप्रक्रिया तांत्रिक असते. आमदारांना थोडं मार्गदर्शन करायचं असतं. म्हणून आमदारांना एकत्र ठेवलं जातं. असं भाजपाने, काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीनेही केलं आहे. त्यामुळे थोबाडावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं काय आहे? तुम्ही केलेलं चालतं? तुमचं गेट-टुगेदर आणि आम्ही आमदारांना बाजूला घेऊन गेलो. मूर्ख लोक आहेत.”
महत्वाच्या बातम्या :

