Share

IND vs SA : पहिल्या टी-२० मॅचसाठी टीम इंडिया सज्ज..! BCCIनं शेअर केला गुरु द्रविड आणि खेळाडूंचा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. ही मालिका ९ जूनपासून सुरू होणार आहे. पहिला सामना दिल्लीत होणार आहे. या मालिकेतून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुलकडे संघाची कमान आहे. हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन झाले असून दुसरीकडे वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना प्रथमच संधी मिळाली. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी निवड समितीने युवा खेळाडूंना संधी दिली आहे.

बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या तयारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये प्रशिक्षक राहुल द्रविड खेळाडूंशी बोलताना दिसत आहे. आयपीएल २०२२मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर केएल राहुलला येथेही चांगला खेळ दाखवावा लागेल. त्याने २ शतकांच्या मदतीने ६०० हून अधिक धावा केल्या. त्याचवेळी हार्दिक पंड्याने कर्णधार म्हणून गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवले.

या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारताला कसोटी तसेच तीन एकदिवसीय मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या पराभवाचा बदला घेण्याकडे लक्ष देईल.

दोन्ही संघ –

भारत : केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप पटेल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, ट्रिस्टियन स्टब्स, रासी व्हॅन डर डुसेन, मार्को जानसेन.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!