Share

अखेर ‘केके’ यांच्या मृत्यूचे कारण समजले, पोस्टमार्टम रिपोर्टमधून माहिती समोर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  तीन दशकांहून अधिक काळ भारतीय संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात गायक ‘केके’ यांचे वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी निधन झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असताना त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे ते परत हॉटेलवर गेले तसे ते कोसळले. त्यानंतर त्यांना कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

‘केके’ यांच्या मृत्यूबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. केके यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणा देखील आढळल्या आहेत. यामुळे अनेक चर्चा होत आहेत. पण नुकताच पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार केके यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले आहे. माहितीनुसार, ‘केके’ यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असला तरी त्यांच्या यकृत आणि फुफ्फुसांची स्थिती फारशी चांगली नव्हती, असेही म्हटले जात आहे.

केके यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलीवूड तसेच राजकीय क्षेत्रातूनही अनेक दिग्गजांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!