मुंबई: राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूलवाढीसाठी चार प्रकारांत देशी दारू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच रंगीत आणि रंगहीन अशी दारू बाजारात उपलब्ध होणार आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“आता देशी दारूही ४ प्रकारांत मिळणार असून महसूलवाढीसाठी महाविकास आघाडी सरकारने नवे धोरण आखले आहे. खंडणी आणि दारूचा महसूल या विषयांची महाविकास आघाडी सरकारने एखादी आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी उघडावी. जगातून नामांकित मंडळी प्रवेशासाठी धावत येईल. जगातील बेस्ट कुलगुरू आपल्याकडे आहेतच.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान राज्य शासनाने महाराष्ट्र देशी नियम १९७३ मध्ये सुधारणा केली आहे. मद्यार्काच्या प्रकारानुसार महसूलही वसूल करण्यात येणार आहे. पहिल्या प्रकारात एका प्रुफ लिटरला १० रुपये , दुसऱ्या प्रकारात १५५ रुपये, तिसऱ्या प्रकारात १८० रुपये असा महसूल आकारला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होणार?; मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले…
- विद्यमान सरकारने दिलेल्या आश्वासनांचे बुडबुडे निरपराध्यांच्या रक्ताने लाल का?; संजय राऊतांचा सवाल
- “…तरीही जम्मू-काश्मीर अशांतच का?”, संजय राऊतांचा केंद्राला सवाल
- KK चे क्रिकेटवरील प्रेम! गायले होते १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकाचे थीम साँग; पाहा VIDEO!
- मेहंदीच्या कार्यक्रमात दीपक चाहर अन् जया भारद्वाजचा भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल!


