Share

“तुमची मॅजिक फिगर लोकांसमोर एकदा मांडाच” ; नाना पटोलेंचं भाजपला आव्हान

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी शाहीर करण्यात आली आहे. इम्रान प्रतापगडी हे काँग्रेसच्या शीर्ष नेत्या प्रियांका गांधी यांचे जवळचे मानले जातात. मात्र या काँग्रेसच्या या निवडीवरून शिवसेनेने आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचा उमेदवार हा महाराष्ट्राबाहेरील परप्रांतीय असल्याने संजय राऊत यांनी नाराजी दर्शवली होती. आता भाजपनेही धनंजय महाडिक यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिली असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. आता राज्यसभेची निवडणूक पार पडणार आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला आव्हान दिले आहे.

“मतांचं गणित उघड असताना भाजपकडून कसला दावा केला जातोय? तुमची मॅजिक फिगर एकदा लोकांसमोर येऊच द्या,” असं खुले आव्हान नाना पटोले यांनी भाजपला दिले आहे. पटोले म्हणाले, “काँग्रेसची चूक नसली तरी चूक दाखवण्याची परंपरा अलिकडच्या काळात केंद्रातल्या आठ वर्षांच्या कमकुवत सरकारनं चालवली आहे. देश बरबाद केलेल्या गोष्टी लपवण्यासाठी काँग्रेसच्या निर्णयावर कुरघोड्या करण्याचा त्यांचे हे प्रयत्न आहेत. आमचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांनी आज फॉर्म भरला तेव्हा मराठीतून शपथ घेतली. यातून देशाची एकात्मता आणि भाषेला मानणारा उमेदवार दिसून आला, हायकमांड आम्हाला असा उमेदवार दिल्याबद्दल आम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार मानतो”

राज्यसभेच्या निवडणुकीक आता नजीक येऊन ठेपली आहे. फार दिवस राहिलेले नाहीत. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दिवसाढवळ्या स्वप्न पाहणारे विरोधक आम्ही पाहिले आहेत. आताही ते या निवडणुकीत मॅजिक फिगरचा दावा करतात. राज्यसभेचं मतदान उघड पद्धतीने करावं लागतं. त्यामुळं एकदा हे लोकांपुढ येऊच द्या. राज्यसभेच्या निवडणुका शक्यतो बिनविरोधच होतात. ही मॅजिक फिगर एकदा लोकांपुढे येऊच द्या, पण तरीही विरोधकांचा दावा असेल तर आता मला त्यावर प्रतिक्रिया द्यायची आहे, असे नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!