🕒 1 min read
मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या राज्यसभा उमेदवारी चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्वीट करत त्यांना डिवचले आहे.
“तथ्यहिन घोटाळे बाहेर काढताना रात्रंदिवस घसा ओरडुन ओरडुन रोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.”, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
तथ्यहिन घोटाळे बाहेर काढताना रात्रंदिवस घसा ओरडुन ओरडुन रोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे . pic.twitter.com/33tqinSTct
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 29, 2022
दरम्यान भाजपाचे गोयल यांच्यासह डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉ. विवेक महात्मे या तीन खासदार निवृत्त होत आहेत. गोयल यांना तिसऱ्यांदा राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- 8 years of BJP : “आज मोदीजींच्या रूपाने भारताकडे…”, अमित शाहांची स्तुतीसुमने
- “भाजपला ‘कोथळा’ शब्दाची ऍलर्जी पण सापळा, कोंडी हे त्यांचे आवडते शब्द”, संजय राऊतांचा टोला
- “भाजपने राज ठाकरेंच्या खांद्यावर ‘भोंगा’ लावून त्यांची कोंडी केली”, ‘शिवसेने’चा आरोप
- “…ही ‘मोदी स्कूल’ची लोणकढी थाप आहे”, संजय राऊतांचा भाजपला टोला
- “…प्रकरणात अजून फडणवीसांनी उडी कशी मारली नाही?”, संजय राऊतांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
