Share

“फक्त मोठ्या बाता मारून सुराज्य होत नाही उद्धवजी”, ‘त्या’ घटनेवरून अतुल भातखळकरांचा टोला

Published On: 

 मुंबई: सांगली येथे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या संतोष पवार या तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला आहे.  गजबजलेल्या रोडवर घडलेल्या हत्येच्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“सांगलीत गजबजलेल्या रस्त्यात तरुणावर धारदार शस्त्रांनी वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात माजलेल्या या अराजकाला पूर्णपणे महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. फक्त मोठ्या मोठ्या बाता मारून सुराज्य होत नाही उद्धवजी.”, असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

दरम्यान विश्रामबाग रोडवर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाजवळ संतोष पवार हा अंडा भुर्जी व्यवसाय करत होता.  रविवारी रात्री तीन हल्लेखोरांनी संतोष पवार याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संतोषचा जागीच मृत्यू झाला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!