Share

“अमरावती शहरात दंगली पेटवण्याचा आरोप…”, अनिल बोंडेंच्या उमेदवारीवरून ‘शिवसेने’चा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या  राज्यसभा उमेदवारी चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र अनिल बोंडे यांना उमेदवारी दिल्याचे शिवसेनेला रुचल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या उमेदवारीवरून शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी भाजपला टोला लगावला आहे.

“अमरावती शहरात दंगली पेटवण्याचा आरोप असलेले, काँगेस नेत्याचे हात छाटू अशी भाषा करणारे डॉ. अनिल बोंडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी… वाह रे भाजप!”, असे ट्वीट मनीषा कायंदे यांनी केले आहे.

दरम्यान भाजपने दुसऱ्या जागेसाठी अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे. बोंडे हे २००९ मध्ये अपक्ष तर २०१४ मध्ये भाजपच्या वतीने विधानसभेवर निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!