Share

“तुमच्या जड बुद्धीला पक्षाने विश्रांती दिलीये, आता राजकीय सन्यास घ्या” ; अमोल मिटकरींचा सदाभाऊंना खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातल्या विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २० जूनला विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान पार पडणार आहे. आता एक मोठी अपडेट हाती येत आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव या निवडणुकीतून सुरुवातीलाच बाजूला पडले आहे. यावेळी त्यांना विश्रांती दिली जाणार असल्याचे भारतीय जनता पक्षाने त्यांना आधीच कळविले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊंचा खोचकपणे समाचार घेतला आहे.

यंदा सदाभाऊ खोत यांना भाजपकडून विधानपरिषेदेची उमेदवारी मिळणार नसल्याचे कळताच, अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे. अमोल मिटकरी आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “आमदारकी साठी इतके दिवस सरकारवर तोंडसुख घेत होता, शेवटी सरसेनापती कडून विश्रांतीचा सल्ला मिळाला. याचा अर्थ तुमची तब्येत ठीक नाही. आता विश्रांती सह राजकीय संन्यास घ्यावा. पक्षाने तुमच्या जड बुद्धीला विश्रांतीचा सल्ला दिलाय.” अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ यांच्यावर टीका केली आहे. अमोल मिटकरी यांनी आता सदाभाऊंना राजकीय सन्यास घेण्याचा सल्ला दिल्याने, सदाभाऊ यांच्या समर्थकांकडून यावर वादंग उमटवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सदाभाऊ यांचा विधानपरिषदेवरून पत्ता कट झाला असला तरी विधानसभा, लोकसभा असे पर्याय सदाभाऊ यांच्यापुढे आहे. मात्र ही लढाई त्यांच्यासाठी कठीण असेल. सदाभाऊ विधान परिषदेलाच निवडतील असं दिसतंय. आता पुढील निवडणूक साधारण दोन वर्षांनंतर होणार आहे. पुढच्या निवडणुकीत त्यांना आशा असेल, परंतु त्यासाठी सदाभाऊंना वाट पाहावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!