Share

राज ठाकरे तुरुंगात जाणार? पोलिसांच्या सुट्ट्या रद्द! पोलीस महासंचालक म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात लाऊडस्पीकर हटवण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे वादात सापडले आहेत. भडकाऊ भाषणाचा ठपका राज ठाकरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राज ठाकरेंवर कलम, ११६, ११७, १३५, १५३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अटकेची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले, औरंगाबादचे पोलीस आयुक्त राज ठाकरे यांच्या कथित वादग्रस्त भाषणाबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई करतील. त्यांनी माहिती दिली की फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 (अदखलपात्र गुन्ह्यांचे प्रतिबंध) अंतर्गत 13,000 हून अधिक लोकांविरुद्ध नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे म्हणाले होते की, मशिदींवरुन लाऊडस्पीकर काढण्याच्या ४ मेच्या अंतिम मुदतीवर ते ठाम आहेत आणि तसे झाले नाही तर सर्व हिंदूंनी या धार्मिक स्थळांच्या बाहेर हनुमान चालीसा वाजवावी. यापूर्वी, सेठ यांनी मंगळवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आणि दोघांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

रजनीश सेठ म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. राज्यात एसआरपीएफ (राज्य राखीव पोलीस दल) आणि होमगार्डचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!