औरंगाबाद : राज्यात सध्या राजकारणाचा पार चांगलाच चढला आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांच्या अटकेची शक्यता खुद्द मनसेच्या नेत्यांनी वर्तवली आहे. तर व्यक्ती कितीही मोठी असू दे, त्यावर कायदेशीर कारवाई होणारच, असे महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता काय होणार? राज ठाकरेंना अटक होणार का ? तसेच पोलीस काय भूमिका घेणार ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तर कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, असे नाना पटोले बोललेले आहेत.
राज ठाकरेंवर कोणती कलमे लावली आहेत ?
आता राज ठाकरेंवर दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कलम ११६, ११७, १३५ आणि १५३ अ अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच औरंगाबाद सभेचे मुख्य आयोजक राजीव जेवळीकर आणि इतर आयोजक यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान राज ठाकरेंवर २००८ च्या जुन्या एका प्रकरणात १४३, १०९, ११७ अशी कलमं लावण्यात आली आहेत. २००८ सालच्या एका प्रकरणात राज ठाकरे यांच्या विरोधात हे अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे. यातली विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं हे वॉरंट अजामीनपात्र आहे. त्यामुळे राज ठाकरेंना या वॉरंटमुळे कोणत्याही प्रकारचा जामीन मिळण्याची शक्यता नाही. सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्यातील न्यायदंडाधिकाऱ्याने हे अटक वॉरंट जारी केले आहे.
२००८ सालच्या प्रकरणात जारी करण्यात आलेल्या वॉरंटमध्ये राज ठाकरेंवर आता पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दहा वर्षांपेक्षा जुनं असलेल्या या प्रकरणात आता विशेष हवालदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अनावश्यक गर्दी करण्यासोबतच, इतरही अनेक कायद्यांचा उल्लंघन केल्याचा आरोप राज ठाकरे यांच्यावर आहे.
आता पोलिसांकडून राज ठाकरेंना अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सरकार आणि मनसेमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. या पाश्वर्भूमीवरून राज्यात तणाव निर्माण शक्यता होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

