औरंगाबाद: औरंगाबाद सभेनंतर राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. औरंगाबाद सभेत मशिंदीच्या भोंग्यांबाबत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला. त्याही आधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २ एप्रिल रोजी शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट आवाजात स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार,’ असा इशारा दिला होता. यावरूनच आता राज ठाकरेंवर दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. यावर संजय राऊत यांनी सूचक इशारा दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच. राऊतांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती तापली आहे.औरंगाबाद येथे झालेल्या सभेतल्या भाषणाची सलग पाच तास चौकशी झाली. त्याचा अहवाल डीजीपींकडे देण्यात आला आहे. सभेपूर्वी देण्यात आलेल्या नियमावलींचं उल्लंघन झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
आता राज ठाकरेंवर दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. कलम ११६, ११७, १३५ आणि १५३ अंतर्गत औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांकडून राज ठाकरेंना अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सरकार आणि मनसेमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. या पाश्वर्भूमीवरून राज्यात तणावाची शक्यता होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

