🕒 1 min read
मुंबई: आज १ मे महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा घेतली. या सभेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांना हिंदू या शब्दाची मुळात अॅलर्जी आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, “शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच अॅलर्जी आहे. शरद पवार प्रत्येकवेळी भाषणात बोलताना शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेतात. महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहेच. पण त्याआधी महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर हे शिवाजी महाराजांचाच विचार घेऊन पुढे गेले”.
“शरद पवार शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाहीत, हे मी सांगितल्यानंतर सगळे बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शिवाजी महाराजांचा फोटो नसतो. आता मी बोलल्यानंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छत्रपतींची प्रतिमा दिसायला लागली. मी जात मानत नाही. मला जातीशी देणेघेणे नाही. मी याठिकाणी ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी उभा नाही”, असेही राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
