औरंगाबाद : ज्यांनी ज्यांनी इतिहास विसरला, त्यांचा भूगोल सटकला. त्यांच्या पायाखालची जमीन सटकली, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. आज १ मे महाराष्ट्र दिनाला राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. राज ठाकरे आपल्या भाषणात देवगिरी किल्ला आणि राजा कृष्णदेवराय यादव यांचा दाखला दिला. आपण गाफील राहिलो तर आपला ऱ्हास होईल. आपण जागे राहिलो पाहिजे.
आल्लौद्दिन खिलजी हा महाराष्ट्रावर चालून आला, देवगिरी खिल्ल्याची लूट केली. आमचा राजा कृष्णदेवराय यादव यांची मुलगी पळवून नेला. कारण आपले लोक गाफील राहिला. खिलजी आला तेव्हा किल्ल्यात फितुरी झाली होती. पुढची चारशे वर्ष महाराष्ट्र खितपत होता. महाराष्ट्रातल्या आयाबहिणीवरती अत्याचार होत होते. मंदिरं पाडली जात होती.
याच फलटणला एकनाथ महाराजांनी हाक दिली. ‘दार उघड बये, दार उघड’ आणि १६३० ला दार उघडलं. छत्रपतींचा जन्म झाला.
छत्रपतींचा जन्म झाला आणि महाराष्ट्रचं दार उघडलं. स्वाभिमानाने कसं जगायचे हे आमच्या राजानं शिकवले आहे. केवळ ५० वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी भव्य काम केले, असे राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :


