🕒 1 min read
पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) चा ४६वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs CSK) यांच्यात होत आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्याच्या अंगउलट आला. ऋतुराज गायकवाड (९९) आणि डेव्हॉन कॉनवे (नाबाद ८५) यांच्या दमदार सलामीच्या जोरावर चेन्नईने हैदराबादला २०३ धावांचे आव्हान दिले आहे. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी १८२ धावा जोडल्या. महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व सांभाळत आहे. रवींद्र जडेजाने या सामन्यापूर्वी सीएसकेचे कर्णधारपद धोनीकडे सोपवले होते.
चेन्नईचा डाव
आज संधी मिळालेल्या डेव्हॉन कॉनवेने ऋतुराजसोबत सलामी दिली. या दोघांनी हैदराबादच्या दमदार गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला आणि ११व्या षटकात शतकी भागीदारी रचली. ऋतुराजने आपल्या घरच्या मैदानावर आक्रमक अंदाजात फटकेबाजी केली, तर कॉनवेने त्याला उत्तम साथ दिली. १५व्या षटकात कॉनवेने आपले पहिले अर्धशतक साजरे केले. याच षटकात दोघांनी मार्को जानसेनला २० धावा ठोकत दीडशतकी भागीदारी पूर्ण केली. शतकाकडे कूच करणाऱ्या ऋतुराजला नटराजनने फसवले. १८व्या षटकात ऋतुराज ९९ धावांवर असताना झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकार ठोकले. पहिल्या गड्यासाठी ऋतुराज-कॉनवेने १८२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कॉनवेवने शेवटच्या षटकात चेन्नईला ११ धावा मिळवून दिल्या. कॉनवेने ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८५ धावा केल्या. २० षटकात चेन्नईने २ बाद २०२ धावा केल्या.
Innings Break!
A 182 run opening stand between Gaikwad and Conway as @ChennaiIPL post a formidable total of 202/2 on the board.
Scorecard – https://t.co/8IteJVPMqJ #SRHvCSK #TATAIPL pic.twitter.com/633jq3TPbn
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
संघाची धुरा सांभाळताच धोनीने दोन खेळाडूंना संधी दिली आहे. डेव्हॉन कॉनवे आणि सिमरजीत सिंग हे खेळाडू चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत. आयपीएलच्या १५व्या मोसमात सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत ८ सामन्यांत ५ विजय नोंदवले असून ते चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जने ८ पैकी फक्त २ सामने जिंकले असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत.
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी. नटराजन.
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक/कप्तान), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, महीश थिक्षना
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
