Share

“पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले, आयत्या बिळावरचा…”; नारायण राणेंचा टोला  

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे? ते पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे म्हणजे कर्तृत्वशून्य माणूस… आयत्या बिळावरचा नागोबा”, असे बोलत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यावर जोरदार निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. म्हणाले, “आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. राज ठाकरेंनी आधी मराठी आणि आता हिंदुत्वाच्या नावाने राजकारण केलं. त्यांचे माकडचाळे लोकांना न समजायला देशातील जनता मूर्ख नाही”, असेही म्हणाले.

या टीकेवर नारायण राणेंना विचारले असता “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं. उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे? उद्धव ठाकरे म्हणजे कर्तृत्वशून्य माणूस.. ते पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रीपदावर बसले. आयत्या बिळावरचा नागोबा. राज ठाकरेंना भोंगा म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:चा भोंगा वाजवत आहेत. त्या माणसावर बोलण्यासारखं फार काही नाही”, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

तसेच “महाराष्ट्रदिनी राज्यातील जनतेला काय देणार ते बोलावं. गरिबी, निरक्षरता, रोजगार, दरडोई उत्पन्न यावर  न बोलता उगीचच फुकटची बडबड. उद्धव ठाकरेंना राजकारण जमत नाही. मुख्यमंत्रीपदावर ते शोभत नाही. त्यांनी महाराष्ट्र १० वर्षे पाठीमागे नेला”, असेही राणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!