Share

“फडणवीसांनी दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर…”; दीपाली सय्यद यांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : “ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से !” अशा शब्दात ट्वीट करत अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. याच मुद्द्यावरून दीपाली सय्यद यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्या म्हणाल्या, ‘योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस योगी होण्यासाठी बायकोला सोडणार का?’ असा सवाल शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी विचारला होता.

पुढे बोलताना अमृता फडणवीस यांचा उल्लेख ‘मामी’ असा करत म्हणाल्या, मामी बद्दल काय बोलायचं फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये. अन्यथा ‘मी पुन्हा येईन’ ‘मी पुन्हा येईन’ हे स्वप्नच राहील, कारण शिवसेना ऐकणार नाही, हे लक्षात ठेवा. असा अप्रत्यक्षपणे इशारा देत अमृता फडणवीस यांना फटकारले.

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील सभेबद्दल बोलताना आजपर्यंत ते कुठेही विजयी झालेले नाहीत, आता तरी विजयी व्हावेत असे म्हणत राज ठाकरे यांनाही टोला लगावला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकातून न्यू कामगार संघटनेच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे उदघाटन दीपाली सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी कोण कशासाठी राजकारण करत आहे, हे डोळ्यासमोर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद मध्ये सभा असून या सभेला कोणीतरी विजयी भव: असा आशीर्वाद दिला आहे. आजवर त्यांना कुठेही विजय मिळालेला नसून आतातरी विजय मिळू देत असेही ते म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!